esakal | मोठी बातमी - सुशांत सिंह तपास प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - सुशांत सिंह तपास प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही

समोर येणाऱ्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याचं सूत्रांकडून समजतंय. 

मोठी बातमी - सुशांत सिंह तपास प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू तपास प्रकरणी सुप्रीम कोर्टाने काल आपला निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने निकाल देत सुशांत सिंह प्रकरणात आता CBI तपास करणार आहे. या निकालामुळे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा धक्का मानला जातो. अशात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मनोरंजन विश्व ते राजकारणी सर्वांनीच आपापल्या प्रतिक्रिया दिल्यात. काल सकाळी सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुनावल्यानंतर संध्याकाळी महाराष्ट्राचे गृहमंत्री नितीन राऊत यांनी कोर्ट जजमेंटची संपूर्ण माहिती घेऊन संध्याकाळची पत्रकार परिषद घेतली. 

अनिल देशमुख यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेत यावर राज्य सरकारची बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राज्य सरकार CBI तपासात संपूर्ण सहकार्य करेल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. मात्र पत्रकारांनी काल अनिल देशमुख यांना राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार का याबाबतही विचारणा केली.  काल अनिल देशमुख यांनी याबाबत मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं. 

महत्त्वाची बातमी -  सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI कडे चौकशी गेल्यानंतर आज शरद पवारांनी केलं ट्विट, म्हणालेत...

दरम्यान, या प्रकरणी समोर येणाऱ्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याचं सूत्रांकडून समजतंय. 

संध्याकाळपर्यंत CBI चं पथक मुंबईत येणार : 

काल निकाल दिल्यानंतर आता तातडीने CBI च्या बड्या अधिकाऱ्यांचं एक पथक मुंबईत दाखल होणारआहे. आज सकाळीच हे पथक दाखल होणार होतं. मात्र आज संध्याकाळपर्यंत CBI चं पथक मुंबईत दाखल होणार आहे. दरम्यान मुंबईतील CBI ची एक टीम मुंबई पोलिसांशी संबंधित केसबाबत चर्चा करत असल्याचंही समजतंय.  

maharashtra state government will not file review petition in sushant singh rajput case

loading image
go to top