कोरोनासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथ, 'या' आहेत मार्गदर्शक सूचना...

कोरोनासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथ, 'या' आहेत मार्गदर्शक सूचना...

मुंबई : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत नागरिकांना कोरोना विषाणूच्या (कोविड-19) प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी औषधांसदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गठित करण्यात आलेल्या टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड ने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:

1. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करा,

2. वारंवार साबणाने हात 20 सेकंदापर्यंत धुवा.

3. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.

4. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा.

5. जिवंत प्राण्यांशी संपर्क टाळा. कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.

6. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळा.

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे

1. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्या. ऋतूनुसार भाज्यांचा समावेश करा.

2. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.

3. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.

4. कोविड लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.

5. थंड, फ्रिजमध्ये ठेवलेले आणि पचायला जड असलेले पदार्थ टाळा.

6. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळा.

7. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.

8. प्रशिक्षित योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करा.

9.  सूप / पाणी - मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्या, ते पोषक आहे.

10. सुवर्ण दुग्ध / दुग्ध - 150 मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्या.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

1. संशमनी वटी 1 गोळी दिवसातून दोनदा असे 15 दिवस.

2. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करा. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण 100 मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून 5-7 मिनिटे ठेवा व नंतर हे पाणी प्या.

3. च्यवनप्राश 10 ग्रॅम सकाळी सेवन करा (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करा).  

4. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेल तेल किंवा हे बोटाने लावा.

5. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळ तेल/ खोबरेल तेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या करा व नंतर हे तेल थुंका व गरम पाण्याने चूळ भरा असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करा.

आयुर्वेदिक औषधी

1. टॅबलेट आयुष 64 - (500 मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे 15 दिवस घ्या.      

2. अगस्त्य हरितकी - 5 ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत 15 दिवस घ्या.

3. अणुतेल - तीळतेल - दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाका.

4. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या.

5. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या.

युनानी औषधी

1. बिहिदाना 5ग्रॅम, बर्गे गावजबान 7 ग्रॅम, उन्नाब 7दाने, सपिस्तान 7 दाने, दालचिनी 3ग्रॅम, बनपाशा 5 ग्रॅम यांचा काढा करून  250मिलिलिटर पाण्यामध्ये 15 मिनिटे उकळा व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून 1 किंवा 2 वेळा 15 दिवसांकरिता घ्या.

2. खमीरा मरवारीद दुधासोबत 5 ग्रॅम दिवसातून दोनदा घ्या. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

युनानी औषधी

1. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या करा, असे 15दिवस करा.

2. तिर्यक अर्बा - हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परता व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळा. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध 15 दिवस घ्या.

होमिओपॅथी औषधी

1. आर्सेनिकम अल्बम 30 - 4 गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्या. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करा.

maharashtra state issued guidelines for the use of ayurveda unani and homeopathy on covid19 patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com