महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आहेत गरम पाण्यचें झरे...

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आहेत गरम पाण्यचें झरे...

महाराष्ट्र, एक असं राज्य ज्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलंय. महाराष्ट्रात केवळ भुरळ घालणारा निसर्गच नाही तर इथे ऊर्जेची नैसर्गिक स्रोतेही आहेत. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, नांदेड, अमरावती, जळगाव आणि रत्नागिरी या जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे आहेत. आणखी काही ठिकाणीदेखील अशाप्रकारे गरम पाण्याचे झरे असतील. या गरम पाण्याच्या झऱ्यांजवळ भाविक, त्याचसोबत धमालमस्ती करणारे पर्यटक कायमच गर्दी करतात. महाराष्ट्रातील या जागा आता पर्यटनस्थळं म्हणून गजबजलेले असतात. महाराष्ट्रातील जिल्ह्यातील गरम पाण्याचे झऱ्यांना प्राचीनतेची पार्श्वभूमीही लाभलेली आहे. जवळपास सर्वच गरम पाण्याच्या झऱ्यांवर काहीनाकाही आख्यायिका जोडल्या गेल्यात.  
 
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे हा नैसर्गिक ठेवा आहे. उन्हाळा असो वा पावसाळा येथील पाण्याची पातळी कायम एक समान असते. तसेच पाण्याच्या तापमानातही अजिबात फरक पडत नाही. निसर्गाची नवलाई अनुभवयाची असेल तर पर्यटनाचा एक वेगळा पैलू महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमधील गरम पाण्याच्या झऱ्यांना प्रत्यक्षात पाहिल्यावर समजतो. 

पुरातन काळापासून गरम पाण्याचे झरे मानवाला आकर्षित करीत आहेत. या गरम पाण्याच्या झऱ्यात स्नान केल्याने त्वचेचे आजार बरे होत असल्याने अनेक पर्यटक गर्दी करतात असेही म्हटले जाते. या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांना कुंडाच्या आकारात बांधून त्यात स्नान करण्यासाठी किेंवा हात-पाय धुण्यासाठी सोय केलेली असते. त्यामुळे अनेक पर्यटक निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी तसेच अनुभवण्यासाठी या ठिकाणी येतात. 

यावेळी या विषयावर बोलताना अलिबाग येथील पत्रकारांनी असे सांगितले की, रत्नागिरी येथील उन्हवरे गावात बारा महिने गरम पाण्याचे झरे सुरु असतात. सर्व ऋतुमध्ये येथील पाणी गरमच राहते. उन्हवरे येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी पर्यटक नेहमी येत असतात. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटन भाग बंद ठेवल्यामुळे सध्या हे पर्यटनाचे ठिकाण आणखीन काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

नांदेड

महाराष्ट्र जिल्ह्याच्या नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरणातील माहूर-किनवट रोडवर माहूर शहरापासून २५ किमी अंतरावर किनवट तालुक्यात वसलेले उनकेश्‍वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत. या पाण्यात औषधी तत्वे असल्यामुळे येथील पाण्यात अंघोळ केल्यामुळे त्वचेसंबंधित रोगांचे निर्मूलन होते. यामूळे अनेक लोक येथे स्नान करण्यासाठी भेट देतात. 

कोकणातील एक प्रमुख जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताना राजापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर रेल्वेस्टेशनकडे जाणारा मार्ग आहे. येथून तीन किलोमीटर अंतरावर उन्हवरे गाव आहे. गावात शिवमंदिर असून या मंदिर परिसरातील भिंतीपलीकडून गरम पाण्याचे झरे वाहतात. परिसरात असलेल्या गोमुखातून २४ तास धारा वाहते. रत्नागिरी जिल्ह्यात उन्हावरे, अरावली, तुरळ आणि राजापूर याठिकाणी ही गरम पाण्याची झरे आहेत. 

ठाणे

ठाणे जिल्ह्यात वज्रेश्‍वरी आणि अकलोली या ठिकाणी गरम पाण्याची झरे आहेत. वज्रेश्‍वरी गावाच्या परिसरात गरम पाण्याचे झरे आहेत. त्याच्या पुढील भागात अकलोली येथेही गरम पाण्याचा झरा असून येथे स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. हे पाणी आरोग्यदायक असून त्वचारोगावर गुणकारी मानले जाते. 

रायगड

रायगड जिल्ह्यास निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे. रायगड जिल्ह्यातील साव, उन्हेरे आणि वडवली याठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. याठिकाणी बारमाही पर्यटक येतात. ज्यांना निसर्गरम्य परिसर आणि पक्षीनिरीक्षणाची आवड आहे असे अनेक पर्यटक येथे येवून भेट देवून जातात.  

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून आठ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरम पाण्याचे झरे हे आकर्षण आहे. हे झरे पाहण्यासाठी बारा महिने लोक गर्दी करतात. 

जळगाव

महाराष्ट्रातील वैविध्यतेने नटलेल्या खान्देशाच्या भूमीत जळगाव जिल्ह्यात चांगदेव, अडावद, उनपदेव, सुनपदेव आणि नाझरदेव या ठिकाणी गरम पाण्याची झरे आहेत. या जिल्ह्यातही निसर्गाचा अनमोल  खजिना दडलेला आहे. या परिसराला लाभलेल्या या गरम पाण्याच्या झऱ्यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देतात. 

मोठी बातमी - भिवंडीत मुसळधार पावसाला सुरुवात, वीजपुरवठा खंडित...

गरम पाण्याच्या झरांनी त्वचारोग बरा होतो

गरम पाण्याच्या झऱ्यातील पाण्यात गंधकाचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी स्नान आणि हात पाय धुण्यासाठी वापरले तर त्वचारोग बरा होतो.  हे पाणी त्वचारोगसाठी अत्यंत गुणकारी असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे

  • रायगड - साव, उन्हेरे आणि वडवली
  • ठाणे - वज्रेश्‍वरी आणि अकलोली
  • नांदेड  - उनकेश्‍वर
  • अमरावती  - सालबर्डी 
  • जळगाव - चांगदेव, अडावद, उनपदेव, सुनपदेव आणि नाझरदेव
  • रत्नागिरी - उन्हवरे, आसवली, राजवाडी, संगमेश्‍वर आणि उल्हास

six destinations in maharashtra where you will find natural sulphur hot water springs

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com