

Adani Group
sakal
मुंबई : देशभरात जीएसटी धोरणानंतर २०२०पासून बहुतांश राज्यांनी तपासणी नाके बंद केले असताना महाराष्ट्रात अदानी समूहासोबतच्या करारामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. परिवहन विभागाने राज्यातील तपासणी नाके बंद करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर अदानी समूहाने करार मोडल्यास साडेसात हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी किंवा २०३३ पर्यंतचा करार पूर्ण करावा, अशी अट घातल्याने राज्य सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे.