
मुंबई : जड-अवजड वाहतूकदारांच्या मागण्यांवर मंत्रालयीन पातळीवर मंगळवारी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यभरातील अवजड वाहतूकदार संप बुधवार पासून सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी मुंबईतील ट्रक, कंटेनर, टेम्पो वाहतुकीवर ४५ ते ५० टक्के परिणाम झाला. तसेच मुंबईत जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत २० टक्के घट दिसून आली.