Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Heat Wave Update: गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून याबाबत हवामान तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Mumbai Heat Wave

Mumbai Heat Wave

ESakal

Updated on

डोंबिवली : कोकण आणि मुंबई महानगर परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही तापमानाने चाळीशी ओलांडत थेट ४२ अंशांपर्यंत मजल मारल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून यंदाच्या वर्षातील हे उच्चांकी तापमान असल्याची माहिती कोकण हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com