
Urfi Javed : "तिला पोलिस संरक्षण..."; महिला आयोगाकडून उर्फीची पाठराखण, चाकणकरांची घेतली होती भेट
मॉडेल उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद आता महिला आयोगाच्या समोर गेला आहे. महिला आयोगाकडे दोघींनीही तक्रार केली आहे. मात्र आता आयोगाने उर्फी जावेदची पाठराखण केल्याचं दिसत आहे.
उर्फी जावेद प्रकरणावरुन मुंबई पोलीस आयुक्तांना आयोगाकडून पत्र देण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करते, माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे, असंं उर्फीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...
हेही वाचा: Sharmila Thackeray: उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची दोन वाक्यांत प्रतिक्रिया
या तक्रार अर्जामध्ये उर्फी पुढे म्हणते, "असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत , सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही. त्यामुळे मला पोलीस संरक्षण देण्यात यावं."
तर मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणं ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करा, असे आदेश महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत.