उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची दोन वाक्यांत प्रतिक्रिया: Sharmila Thackeray reaction on Urfi Javed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharmila Thackeray

Sharmila Thackeray: उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची दोन वाक्यांत प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात कपड्यावरुन वाद सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांनी मांडलेलं मत चर्चेत आहे. (Sharmila Thackeray reaction on Urfi Javed Chitra Wagh )

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या काल एका कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांना उर्फी जावेदवर सुरु असलेल्या वादासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी केवळ दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: Chitra Wagh : "उर्फी जावेद भाजपमध्ये आली तर..." ; चित्रा वाघ पत्रकारांच्या प्रश्नावर भडकल्या

'मी पूर्ण कपड्यात फिरते. बाकीच्यांचे मला माहीत नाही,' असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं. शर्मिला ठाकरे यांनी याप्रकरणावर अधिक बोलणं टाळलं.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर नंगटपणा करू नये, अशी भूमिका घेतली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर मी कोणते कपडे परिधान करावेत हे निवडण्याचा मला अधिकार आहे, असे म्हणत उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्या मागणीला थेट धुडकावून लावले आहे.

तसेच चित्रा वाघ यांनी धमकी दिल्याचा आरोपही उर्फी जावेदने केला आहे. काही दिवसांपूर्वी तर ट्वीटच्या माध्यमातून उर्फीने चित्रा वाघ यांना थेट लक्ष्य केले होते.

हेही वाचा: Urfi Javed : उर्फी जावेद मुस्लिम असल्याने भाजपकडून टार्गेट...तृप्ती देसाई अ‍ॅक्शन मोडमध्ये

कालही चित्रा वाघ यांनी उर्फीवर भाष्य केलं. लोकांसाठी हे राजकारण असेल पण माझ्यासाठी हा संस्कृतीचा प्रश्न आहे. मी वकील नाही पण मला कायद्याची तरतूद काय आहे हे माहीत आहे. माझा मेसेज खूप स्ट्राँग आहे. सरकार सरकारचे काम करेल. पोलीस पोलिसांचे काम करतील. आम्ही आमचं काम करू. नंगा नाच मुंबईत रोखला नाही तर औरंगाबाद येथील चौकात हे नाच होतील, अशी भीती वाघ यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Chitra Wagh