राज्यपाल कोणताही राजकीय 'बखेडा' निर्माण करणार नाहीत; यादी दिल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

राज्यपाल कोणताही राजकीय 'बखेडा' निर्माण करणार नाहीत; यादी दिल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी काल (शुक्रवारी) महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडून राज्यपालांना सादर करण्यात आली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री नवाब मलिक, शिवसेना पक्षातील मंत्री अनिल परब आणि काँग्रेच पक्षातील मंत्री अमित देशमुख या तिघांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाविकास आघाडीकडून मंत्रिमंडळ बैठकीत ठरलेल्या १२ नावांची यादी राज्यपालांना सादर केली गेली. यानंतर राज्यपाल आता या यादीबद्दल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी घटनाविरोधी काम करणार नाहीत आणि आम्ही पाठवलेली यादी मंजूर करतील असा विश्वास शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते, मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, मला असं वाटतं की महाराष्ट्राचे राज्यपाल या बाबतीत कोणताही राजकीय 'बखेडा' यानिमित्ताने निर्माण करणार नाहीत. राज्यपाल सुज्ञ आहेत, राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि राज्यपालांचे आमच्यावर प्रेम आहे. ते  किती प्रेम आहे ते देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे. या प्रेमातूनच या पुढे सगळा कारभार सुरळीत होईल.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांना दिल्या गेलेल्या उमेदवारीबाबत भाष्य केलं. उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेतील यादीमध्ये आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी रोखठोक बोलणारी, देश आणि महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत जाण असणारी अभिनेत्री जर सभागृहात जात असेल तर त्याचा महाराष्ट्राला फायदाच होईल, असंही संजय राऊत म्हणालेत. 

maharashtras governor bhagatsingh koshyari will not create any political chaos says sanjay raut

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com