
मुंबई : मुंबई पुण्यात कोरोनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा प्रत्येक सण हा अत्यंत साधेपणाने, घरच्या घरी साजरा करतोय. कोरोनामुळे सर्वच व्यवसायांना घाटा सहन करावा लागतोय. महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु झालीये. मात्र पूर्वीप्रमाणे सर्व गोष्टी अजूनही उघडण्यात आलेल्या नाहीत. अशात सध्या प्रामुख्याने एक मागणी होतेय, ती म्हणजे धार्मिक स्थळं उघडण्याबाबत.
कालच त्र्यंबकेश्वर मधील पुजाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेऊन राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत मागणी केलेली. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सर्व मंदिरं पूर्णपणे बंद आहेत. अर्थात गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून तसा निर्णय घेण्यात आलाय. मात्र मंदिरं बंद असल्याने पुजारी आणि त्याचसोबत त्या मंदिर परिसरातील व्यावसायिक नाराज असल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर सरकारकडे सातत्याने मंदिरं खुली करण्याची मागणी होतेय. यावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांनी आपलं मत मांडलं आहे.
मंदिरं खुली करण्यावर काय म्हणालेत राजेश टोपे :
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं सरकारकडून उचलली जातायत. अशात गेले काही महिने राज्यातील मंदिरं बंद आहेत. मंदिरं खुली करण्याबाबत राजेश टोपे म्हणालेत की, ईश्वर सर्वत्र आहे. धार्मिक स्थळांबाबत लोकं अधिक भावनिक असतात, त्यामुळे अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचं पालन होणार नाही. जर काटेकोरपणे पालन केलं गेलं तर मात्र धार्मिक स्थळं सुरु करण्यास कुणीही विरोध करणार नाही. मात्र अजून थोडं सबुरी बाळगू आणि वेळ लागला तरीही हरकत नाही, असं राजेश टोपे म्हणालेत.
maharashtras health minister rajesh tope on opening temples in the state
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.