अत्यंत महत्त्वाचं : यंदा थेट विसर्जनासाठी जाता येणार नाही, विसर्जनासाठीची नियमावली वाचून घ्या

सुमित बागुल
Tuesday, 18 August 2020

यंदा कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनाच यंदाचा गणेश उत्सव सावधानपणे आणि साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. 

मुंबई : यंदा कोरणामुळे सर्वच उत्सवांवर आच आलीये. अशात आपल्या सर्वांचा लाडका सण, गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपलाय. गणेश आगमन आणि विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे गणेश आगमनावेळी आणि विसर्जनावेळी निघणाऱ्या मिरवणुकांमधून, गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने नियमावली जारी केली आहे. कोरोनाच्या सावटामध्ये यंदाचा गणेशउत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विसर्जनासाठी एक महत्त्वपूर्ण नियमावली जारी केलीये. 

मुंबई महापालिकेने नागरिकांना आवाहन केलंय की, गणेश आगमन आणि मिरवणुका मोठ्या पद्धतीने, आधीसारख्या काढता येणार नाहीत. ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे. ज्यांच्या घराजवळ एक ते दोन किलोमीटरमध्ये नैसर्गिक तलाव किंवा कृत्रिम तलाव आहे त्यांनीच विसर्जनासाठी जावं. तलाव किंवा समुद्राजवळ यंदा बाप्पाची आरती देखील करता येणार नाहीये. 

हेही वाचा : मुंबईत यायला निघाले 45 कोटींचे म्यॅव म्यॅव; मुंबईतील प्रयोगशाळा, हैद्राबादमधील कारखाना उद्धवस्त

मुंबई महापालिकेच्या वतीने प्रत्येक विभागात गणेश मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात ६ ते ७ मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. यंदा कुणालाही समुद्रात विसर्जनासाठी जाता येणार नाही. संकलित मुर्त्यांचं विसर्जन मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका यंदा वाहनांवर फिरते कृत्रिम तलाव देखील मानले जाणार आहेत. फिरत्या कृत्रिम तलावांच्या मदतीने तुम्हाला विसर्जन करता येऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे यंदा मुंबईतील तब्बल 167 कृत्रिम तलावांमध्ये आणि नैसर्गिक विसर्जन केंद्रावरही यंदा थेट थेट विसर्जनाला बंदी असणार आहे. मुंबईत यंदा आधीच्या तुलनेत पाच पटीने अधिक कृत्रिम विसर्जनस्थळे तयार करण्यात आली आहेत. 

यंदा कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनाच यंदाचा गणेश उत्सव सावधानपणे आणि साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. 

rules and regulations issued by BMC for ganesh immersion in mumbai read full news 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rules and regulations issued by BMC for ganesh immersion in mumbai read full news