यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार; ७ डिसेंबरपासून सुरु होणार अधिवेशन

सुमित बागुल
Tuesday, 10 November 2020

यंदाचे अधिवेशन किमान १५ दिवस व्हावे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटलंय

मुंबई : यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालाय. ७ डिसेंबरपासून यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज मुंबईत सुरु होणार आहे. नागपूरऐवजी मुंबईत यंदाचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन आता मुंबईत होणार आहे, गिरीश महाजन यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

दरम्यान, यंदाचे अधिवेशन किमान १५ दिवस व्हावे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटलंय. हिवाळी अधिवेशन कालावधीमध्ये जास्त चर्चा करायची नाही का? असा सवाल विचारात सरकार प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. 

Bihar Election : "नितीशकुमारांना मुख्यमंत्री करावेच लागेल; नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत"

यंदा हिवाळी अधिवेशन जरी आता मुंबईत होत असले तरीही किमान अर्थसंकल्पीय अधिवेशनतरी नागपूरला व्हावे ही देखील भारतीय जनता पक्षाची मागणी असल्याचेही गिरीश महाजन यांनी नमूद केले आहे. 

कोरोना प्रादुर्भाव असल्याने यंदा नागपूरमध्ये अधिवेशन नको अशी भूमिका आहे म्हणूनच यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहेत.  

maharashtras winter assembly session will be conducted in mumbai from 7th december


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtras winter assembly session will be conducted in mumbai from 7th december