esakal | Bihar Election : "नितीशकुमारांना मुख्यमंत्री करावेच लागेल; नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत"
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Election : "नितीशकुमारांना मुख्यमंत्री करावेच लागेल; नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत"

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणालेत की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू  प्रकरणाचा बिहार निवडणुकांमध्ये फायदा झाल्याचे दिसत नाही.

Bihar Election : "नितीशकुमारांना मुख्यमंत्री करावेच लागेल; नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत"

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : बिहार निवडणुकांचे निकाल आज लागतायत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये निवडणुका घेतल्या गेल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वोटिंग बुथची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे निकाल यायला रात्र होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान बिहारच्या निकालांवर आणि समोर येणाऱ्या कलांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधला आणि आपली Bihar Election बाबत मते मंडळीत. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत असं वक्तव्य केलंय.   

​Bihar Election : मुंबईतील बिहारींच्या बिहार विधानसभा निकालानंतर काय आहेत अपेक्षा?

शिवसेनेने कायमच जनता दल युनायटेडला अलर्ट करण्याचं काम केलंय. ज्या प्रकारे महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं महाराष्ट्रात फिस्कटलं त्या प्राश्वभूमीवर आताचे कल तसेच बोलतायत असं वाटतं का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणालेत की, बिहारमध्ये भाजपचे सर्व नेते एकमुखाने बोलतायत की 'नितीश बाबू'च मुख्यमंत्री होणार. त्यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेला धन्यवाद द्यायला हवे. कारण महाराष्ट्रात जो खेळ करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आम्ही त्याबाबतीत जो पलटवार केला त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रपक्षांशी अशा पद्धतीने वर्तणूक करणार नाही. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनतील आणि त्यांना मुख्यमंत्री बनवावं लागेलच असंही राऊत म्हणालेत. 

दरम्यान माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणालेत की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू  प्रकरणाचा बिहार निवडणुकांमध्ये फायदा झाल्याचे दिसत नाही.

​Bihar Election  : बिहार निवडणूक निकाल व्हाया 'जस्टीस फॉर सुशांत' आणि  'ना भूले हैं, ना भूलने देंगे'!

दरम्यान, सध्याच्या राजकारणात कोणतीही नैतिकता बाकी नाही. जर राजकारणात नैतिकता बाकी राहिली असती तर महाराष्ट्रात देखील अनेक गोष्टी एक वर्षाआधीच बदलल्या असत्या असेही संजय राऊत म्हणालेत.  

bihar election results nitish kumar must thank shiv sena says sanjay raut