सुटीमुळे नागरिकांची  प्रदूषणातून सुटका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

महाशिवरात्रीच्या सार्वजनिक सुटीमुळे शुक्रवारी (ता. 21) मुंबईसह नवी मुंबईतील नागरिकांची वायुप्रदूषणातून सुटका झाली. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात या महिन्यातील आणि नवी मुंबईत चार दिवसांतील सर्वांत कमी प्रदूषणाची नोंद झाली

मुंबई : महाशिवरात्रीच्या सार्वजनिक सुटीमुळे शुक्रवारी (ता. 21) मुंबईसह नवी मुंबईतील नागरिकांची वायुप्रदूषणातून सुटका झाली. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात या महिन्यातील आणि नवी मुंबईत चार दिवसांतील सर्वांत कमी प्रदूषणाची नोंद झाली. 

महत्वाची बातमी ः "हा तर मुंबईकरांना आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर काढण्याचा डाव..."

मुंबईत प्रामुख्याने बांधकामांमुळे उडणारी धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे वायुप्रदूषण होते. शुक्रवारी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुटी असल्याने रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी होती व अनेक ठिकाणी बांधकामे बंद होती. परिणामी प्रदूषणाच्या पातळीत घट झाल्याचे सांगण्यात आले. 

महत्वाची बातमी ः खुशखबर! आता पनवेलवरुन थेट गोरेगावपर्यंत लोकल सेवा

मुंबईत या महिन्यातील सर्वांत कमी प्रदूषणाची नोंद 10 फेब्रुवारीला झाली होती. प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण 10 फेब्रुवारीला 137 मायक्रोग्रॅम, तर 21 फेब्रुवारीला 132 मायक्रोग्रॅम होते. 
शहरातील सर्वांत प्रदूषित ठिकाण असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातही हवेचा दर्जा चांगला होता. बीकेसी येथे पीएम 2.5 चे प्रमाण 10 फेब्रुवारीला 166 मायक्रोग्रॅम, 21 फेब्रुवारीला 145 मायक्रोग्रॅम होते. 
नवी मुंबईत गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी हवेच्या दर्जात सुधारणा झाली. हवेतील तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण गुरुवारी 404 मायक्रोग्रॅम आणि शुक्रवारी 347 मायक्रोग्रॅम नोंदवण्यात आले. भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत प्रदूषणाची पातळी नोंदवली जाते. 

हेही वाचा ः नको मोबाईल, नको कार्ड; आता फक्त चेहरा दाखवा आणि पेमेंट करा, कसं...

प्रदूषकांच्या पातळीवरून हवेचा दर्जा 

  •  0 ते 50 मायक्रोग्रॅम : उत्तम 
  •  50 ते 100 मायक्रोग्रॅम : चांगला 
  • 100 ते 200 मायक्रोग्रॅम : ठीक 
  • 200 ते 300 मायक्रोग्रॅम : खराब 
  • 300 ते 400 मायक्रोग्रॅम : अतिप्रदूषित 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahashivratri holiday reduces pollution in mumbai