मदरशांत घुमणार महात्मा फुलेंचे विचार! द्विशताब्दी जयंतीनिमित्त 'गुलामगिरी'सह, 'शेतकऱ्याचा आसूड'चा उर्दू अनुवाद

Mahatma Jyotirao Phule: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा असूड’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचा उर्दू भाषेत अनुवाद करून प्रकाशन करण्यात येणार आहे.
mahatma jyotiba phule

mahatma jyotiba phule

sakal

Updated on: 

मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त (द्विजन्मशताब्दी) अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात महात्मा फुले यांच्या विचारांचा भाषिक विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत 'गुलामगिरी' 'शेतकऱ्याचा त्यांच्या आणि आसूड' या निवडक ग्रंथांचा उर्दू अनुवाद करून ते प्रकाशित करण्यात येणार आहेत. या कामासाठी अकादमीच्या २०२६-२७ या वर्षातील मंजूर सहायक अनुदानातून २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...