समन्वय समिती तर बनेल, पण 'ती वक्तव्य थांबतील का ?

प्रशांत बारसिंग
Monday, 20 January 2020

महाविकास आघाडीचा लवकरच केंद्रीय समन्वय समिती 

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकण्यासाठी राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन पक्षांच्या केंद्रीय नेत्यांची समन्वय समिती लवकरच स्थापन केली जाणार असल्याचे समजते. यापूर्वी राज्यस्तरावरील नेत्यांची समिती स्थापन केली जात होती. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने अनेक नेत्यांच्या विधानामुळे उलटसुलट चर्चांमुळे राजकीय फड रंगत आहे. त्यामुळे हे वादविवाद टाळण्याबरोबरच सरकार पाच वर्षे टिकरण्यासाठी केंद्रीय स्तरावरील समन्वय समिती स्थापन होणार आहे.

मोठी बातमी - अजित पवारांच्या कामाचा शिवसेनेच्या मंत्र्याला दणका.. वाचा काय केलंय अजित पवारांनी..

कॉंग्रेसचे अहमद पटेल आणि मल्लीकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद व प्रफुल पटेल, शिवसेनकडून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार अनिल देसाई या समितीत असतील असे सांगण्यात आले. समिती केंद्रीय स्वरूपात असल्याने समितीचा धाक तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्रीमंडळावर असेल. समन्वय समितीची बैठक प्रत्येक महिन्यात होणार असून सरकारच्या कामांचा आढावा हि समिती घेईल. सरकारमधील अंतर्गत वादाचे विषय असतील तर ते समितीच्या बैठकीच चर्चिले जातील आणि त्यातच निर्णय होईल. या विषयांवर तिन्ही पक्षांच्या कोणत्याही नेत्याला बोलण्यास मज्जाव असेल. त्याचबरोबर पक्षाची स्वतंत्र भूमिका मांडण्याची जबाबदारी पक्षाच्या फक्‍त एका नेत्याकडे असेल. त्यामुळे कोणतेही वादविवाद होणार नाहीत, असा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी घेतल्याचे समजते.

मोठी बातमी - भाडेकरूआणि घरमालकाच्या न्यायालयीन वादासंदर्भात मुंबई उच्च न्ययालयाचा मोठा निर्णय

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक विषयांवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची परस्पर विधाने समोर आल्याने विरोधात असलेल्या भाजपला टिका करण्याची आयतीच संधी मिळत असल्याचे समन्वय समिती लवकरच स्थापन होणार आहे. 

'ती' वादग्रस्त वक्तव्य - 

  • माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि करीमलाला यांची भेट व्हायची - संजय राऊत 
  • संजय राऊत यांनी सांभाळून बोलावे - बाळासाहेब थोरात 
  • इंदिराजींबाबत कुणीही शिवसैनिक कोणतेही विधान करणार नाही - आदित्य ठाकरे 
  • स्वातंत्रयवीर सावरकर यांचा सन्मान झालाच पाहिजे - संजय राऊत 
  • सावरकरांबाबत पक्षाचे धोरण वेगळे आहे. सत्तेसाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही - विजय वडेटटीवार 

मोठी बातमी - सेक्स-प्रूफ मेक-अप; आता 'त्या' क्षणांनंतरही तुमचा मेक-अप राहील तसाच..

  • सावरकरांचे योगदान मोठे - खासदार हुसेन दलवाई 
  • सत्तेसाठी 2014 साली शिवसेनेने कॉंग्रेसला प्रस्ताव दिला होता - पृथ्वीराज चव्हाण 
  • त्यावेळी काय झाले ते माहित नाही - ऍड. अनिल परब 
  • अल्पमतातील सरकार पाडण्यासाठी शिवसेनेचा प्रस्ताव होता परंतू त्यात दम नव्हता - विजय वडेटटीवार

mahavikas aaghadi to form co ordination committee to stop controversial statements


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aaghadi to form co ordination committee to stop controversial statements