esakal | अजित पवारांच्या कामाचा शिवसेनेच्या मंत्र्याला दणका.. वाचा काय केलंय अजित पवारांनी..
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवारांच्या कामाचा शिवसेनेच्या मंत्र्याला दणका.. वाचा काय केलंय अजित पवारांनी..

सुभाष देसाई देखिल औरंगाबादला तातडीने रवाना.. 

अजित पवारांच्या कामाचा शिवसेनेच्या मंत्र्याला दणका.. वाचा काय केलंय अजित पवारांनी..

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाक्‍यात कामाला सुरूवात केली असून त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रयांची धावपळ उडाली. त्यांच्या या कामाचा दणका शिवसेनेच्या मंत्रयांनाही बसला असून औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी औरांगाबादला तातडीने रवाना झाले आहेत.

अजित पवार यांच्या कामाची पद्धत सर्वांना सर्वश्रुत आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर गेल्या आठवडण्यात ते सकाळी सात वाजताच पुण्यात दाखल झाले. त्यामुळे अधिका-यांची भल्या सकाळी चांगलीच धावपळ झाली. पवार यांनी दादरच्या इंदू मिलमध्ये आकारास येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी भेट घेवून स्मारकाच्या नियोजन आराखडयात अनेक बदल सुचविले.

हे माहितीये का ? सेक्स-प्रूफ मेक-अप; आता 'त्या' क्षणांनंतरही तुमचा मेक-अप राहील तसाच..

वित्तमंत्री म्हणून देखिल त्यांनी विभागाच्या बैठकांच्या आढावा बैठकांचा धडाका सुरू झाला असून वित्त विभागाचे अधिकारी सकाळी सात वाजताच बैठकांच्या शक्‍यतेमुळे तयारीत राहत असल्याचे सांगण्यात आले. अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मंत्रयांनाही चांगलेच कामाला लावल्याचे समजते. वित्त मंत्री या नात्याने त्यांनी सरकारमधील सर्वच मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या जिल्हयांची नियोजन समितीच्या बैठका घेवून त्याचा अहवाल आज (सोमवारी) उशीरापर्यंत पाठविण्याचे आदेश दिले आहे.

मोठी बातमी - ​भाडेकरूआणि घरमालकाच्या न्यायालयीन वादासंदर्भात मुंबई उच्च न्ययालयाचा मोठा निर्णय

उद्योगमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद जिल्हयांचे पालकमंत्री आहेत. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व पालकमंत्री आपल्या जिल्हयात ध्वजारोहन करणार आहे. त्यापूर्वी 25 जानेवारी रोजी औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीचा बैठक घेवून अहवाल देतो, असा निरोप देसाई यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला. हि बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी अर्थसंकल्पात औरंगाबादसाठी निधी मिळाला नाही तर चालेल का, असा सवाल करून हा निरोप देसाई यांना देण्याचे आदेश कार्यालयातील अधिका-यांना दिले. या निरोपामुळे देसाई आजच तातडीने औरंगाबादला रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोठी बातमी -  वर्षभरानंतर श्रीनिवास परदेशातून आला आणि त्यांच्यात झालं...

अजित पवार यांनी या कामासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अंशी सूट दिली आहे. शिंदे ठाणे आणि गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे गडचिरोलीचा अहवाल उद्या 21 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत दिला तरी चालेल, अशी सूट शिंदे यांना मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाणे नियोजन समितीची आज बैठक संपवली असून उद्या ते गडचिरोलीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

after DCM ajit pawars orders shivsena minister subhash desai leaves for aurangabad