esakal | महाविकास आघाडीचा 22-13-12 चा फॉर्म्युला; खातेवाटपात शिवसेनेचा वरचष्मा
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीचा 22-13-12 चा फॉर्म्युला; खातेवाटपात शिवसेनेचा वरचष्मा

महाविकास आघाडीचे गेल्या 15 दिवसांपासून रखडलेले खातेवाटप अखेर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभुमिवर मार्गी लागले असून खातेवाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीचा 22-13-12 चा फॉर्म्युला; खातेवाटपात शिवसेनेचा वरचष्मा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई   शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे गेल्या 15 दिवसांपासून रखडलेले खातेवाटप अखेर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभुमिवर मार्गी लागले असून खातेवाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शपथ घेतलेल्या सहा मंत्रयांमध्ये अधिवेशनातील कामकाज पाहण्यासाठी हे खातेवाटप झाले असले तरी ही खाती मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्या त्या पक्षांकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येते. या खातेवाटपानुसार शिवसेनेकडे 22 , राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 13 तर कॉंग्रेसकडे 12 खात्यांचा कार्यभार राहणार आहे. 

गृह खात्याचा तिढा सोडवला 
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गृहखाते गेले असते तर ते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांच्यापैकी कोणाला दयायचे यावर पक्षांत स्पर्धा सुरू झाली असती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या खात्याच्या बदल्यात आणखी एक खाते जादा घेउन गृह खाते शिवसेनेला सोडले असल्याचे बोलले जाते.  

गृह खाते राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार की शिवसेनेकडे राहणार अशी चर्चा सुरू झाली असताना ते शिवसेनेकडेच राहिले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे मागील मुख्यमंत्रयांच्या पावलावर पाउल ठेवत गृह खाते स्वतःकडे ठेवणार की पक्षाच्या इतर मंत्रयांना देणार याबाबत तर्क सुरू आहे. 

हे फोटो पहिले नाही तर काय पाहिलं  करीनाचे साडीतले हे फोटो पाहिलेत का? यावर आहे 'हटके' काही..
 

तीन पक्ष सत्तेत सहभागी झाल्यामुळे खातेवाटपाचा तिढा सुटण्यास विलंब लागत होता. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून स्वतः मुख्यमंत्री ठाकरे, कॉंग्रेस पक्षाचे हायकमांड तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चर्चेच्या अनेक फे-यानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

शिवसेनेने मुख्यमंत्री पदासह नगरविकास, गृह ही दोन प्रमुख खाती राखली आहेत. तर राष्ट्रवादीकडे वित्त आणि नियोजन, ग्रामविकास, तर कॉंग्रेसकडे महसूल, उर्जा ही प्रमुख खाती आहेत. शिवसेनेने कृषी खाते आपल्याकडे ठेवले आहे. शेतकरी कर्ज माफी, शेतक-यांचे प्रश्‍न याबाबत स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आग्रही आहेत. त्यामुळे कृषी खाते शिवसेनेने घेतले आहे. 

महत्त्वाची बातमी :  मोबाईल नंबर पोर्ट करायचाय? आता 'हे' आहेत नवीन नियम..

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेच्या वाटयाला आलेली बहुसंख्य मंत्रीपदे शिवसेनेने आपल्याकडे राखली असून यामध्ये परिवहन, मृदू व जलसंधारण, उदयोग आणि खनीकर्म, रोजगार हमी योजना, फलोदयोन, परिवहन, बंदरे आणि खारभूमी विकास या खात्यांचा समावेश आहे. 

शिवसेनेकडील खाती : 
गृह, नगरविकास, वन पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदु व जलसंधारण, पर्यटन , सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) संसदीय कार्य, आणि माजी सैनिक कल्याण खाते, उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना , फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्विकास, बंदरे आणि खर भूमी विकास

राष्ट्रवादीकडील खाती : 

ग्रामविकास , जलसंपदा ब लाभक्षेत्र विकास , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास. 

कॉंग्रेसकडील खाती :

उर्जा व अपारंपरिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय,  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून ) आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.   

mahavikas aaghadi revealed their 23-13-12 formula shivsena kept important ministries