मोबाईल नंबर पोर्ट करायचाय? आता 'हे' आहेत नवीन नियम..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

  • येत्या 16 डिसेंबर पासून नवीन नियम लागू होणार
  • तीन दिवसांमध्ये ग्राहक आपला नंबर पोर्ट करू शकणार

मोबाईल नंबर पोर्ट करण्याची पद्धत आता बदलणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI ने मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी नवीन नियम लागू केलेत. या नव्या नियमानुसार आता एक  UPC म्हणजेच युनिक पोर्टिंग कोड जनरेट करावा लागणार आहे. येत्या 16 डिसेंबर पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. या नंतर आता तीन दिवसांमध्ये ग्राहक आपला नंबर पोर्ट करू शकणार आहेत. एका सर्कल मधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यास पाच दिवस लागणार आहेत. उदाहरणार्थ मुंबई सर्कल मधून महाराष्ट्र सर्कलमध्ये नंबर पोर्ट कारचा झाल्यास पाच दिवस लागणार आहेत.  

आतली खबर : प्रत्येक मंत्र्याला चार खाती, संध्याकाळी निघणार नोटिफिकेशन

नवीन नियमानुसार आता हा UPC कोड तुम्ही मोबाईल नंबर पोर्ट करण्याच्या योग्यतेचे असाल तरच करता येणार आहे. त्यातही (UPC) युनिक पोर्टिंग कोड जनरेट करणं अनेक गोष्टींवर अवलंबून असणार आहे. TRAI ने प्रकाशित माहितीत याबाबत सांगण्यात आलंय.  

नवीन नियमांच्या अनुसार जे पोस्ट पेड ग्राहक आहेत, त्यांना आधीच्या मोबाईल कंपनीची सर्व थकबाकी भरावी लागणार आहे. याचबरोबर जे ग्राहक किमान 90 दिवस त्या ऑपरेटरची सुविधा वापरतायत, अशाच पोस्ट पेड ग्राहकांना आपला मोबाईल नंबर पोर्ट करता येणार आहे. यामधील तिसरा नियम म्हणजे, आधीच्या ऑपरेटर कडून निर्धारित सर्व नियम आणि अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे. जर त्यांची पूर्तता झालेली नसेल, तर तुम्ही तुमचा पोस्ट पेड नंबर पोर्ट करू शकत नाहीत.     

महत्त्वाची बातमी :  'थकीत कर्ज कमी करा, देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक' - शक्तिकांता दास

देशातील काही भाग वगळता सर्व परवानाधारक सेवा क्षेत्रात युनिक पोर्टिंग कोड (UPC)  4 दिवस वैध राहील. जम्मू-कश्मीर, आसाम, ईशान्य भारतात UPC ची वैधता 30 दिवसांची आहे. 

WebTitle : new TRAI ruls will allow user to port their numbers in three working days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new TRAI ruls will allow user to port their numbers in three working days