अनिल देशमुखांना अटक होणार? 'ईडी'चे मुंबईच्या घरातही छापे

अनिल देशमुखांना अटक होणार? 'ईडी'चे मुंबईच्या घरात छापे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगल्यासह आणखी काही ठिकाणी छापेमारी Mahavikas Aghadi Ex Minister Anil Deshmukh in Deep Trouble can be arrested by ED after raids on Properties
Anil Deshmukh
Anil Deshmukh
Summary
  • सध्या अनिल देशमुख वरळीतील सुखदा निवासस्थानी

  • ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता

  • मुंबईतील शासकीय निवासस्थानासह एकूण ५ ठिकाणी छापेमारी

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी सध्या प्रचंड वाढताना दिसत आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या (Nagpur) घरात ईडीने (Enforcement Directorate) छापेमारी केली. त्यावेळी अनिल देशमुख नागपूरात नसून मुंबईत (Mumbai) असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर काही तासांतच अनिल देशमुखांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी (Official Residence) म्हणजे ज्ञानेश्वरी बंगल्यावर (Dynaneshwari Bungalow) ईडीने छापे टाकले. त्यासह, देशमुखांचे वरळीत (Worli) असणाऱ्या निवासस्थानासह मुंबईतील एकूण ४ वेगवेगळ्या ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या या कारवाईमुळे सध्या अनिल देशमुख यांना अटक करण्याची तयारी ईडीकडून केली जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे दिसतंय. (Mahavikas Aghadi Ex Minister Anil Deshmukh in Deep Trouble can be arrested by ED after raids on Properties)

Anil Deshmukh
परांजपे बिल्डर्सना अटक केलेली नाही- मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानीदेखील इडीची छापेमारी असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर अनिल देशमुख हे वरळीतील सुखदा निवासस्थानीच असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरसह अन्य ५ ठिकाणी EDची छापेमारी सुरू आहे. सकाळी साडेसात वाजता ईडीचे एक पथक वरळीतल्या सुखदा इमारतीत छापा टाकण्यासाठी पोहोचले. त्यानंतर सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान ईडीची टीम ज्ञानेश्वरी बंगल्यावर आली. सध्या ज्ञानेश्वरी बंगल्यात एक टीम आहे. या टीममध्ये ईडीचे आठ अधिकारी आहेत. तसेच, वरळी येथील सुखदा बिल्डींगमध्ये सहा जणांचे पथक आहे.

Anil Deshmukh
मुंबई: रहिवाशांनी लसीच्या नावाखाली डिस्टिल्ड वॉटरचे डोस घेतले?

कोणत्या ५ ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची चर्चा?

मुंबई

1) वरळीच्या अनिल देशमुख यांच्या सुखदा बिल्डिंगमध्ये

2) सरकारी निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगला येथे

3) वरळी राहणाऱ्या अनिल देशमुखांच्या CAच्या घरी

नागपूर

1) अनिल देशमुखांच्या नागपूर निवासस्थानी

2) अनिल देशमुखांचे बिजनेस पार्टनर असलेल्या सागर भातेवार यांच्या शिवाजी नगर येथील घरी

त्याशिवाय, प्रत्येक टिममध्ये 6 ते 7 अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान असल्याची माहिती आहे. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तही मागवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com