
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कामकाजाच्या सातव्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या विधान भवनात येत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हे विधिमंडळाच्या प्रथा – परंपरांना साजेसे नाही, त्यामुळे विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकत निषेध केला. तसेच विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना बोचरी टीका करत डिवचल्याचे समोर आले.