देशमुख, परब यांच्यापाठोपाठ सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात?

देशमुख, परब यांच्यापाठोपाठ सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात? किरीट सोमय्यांचा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर खळबळजनक आरोप Mahavikas Aghadi Another Minister Jitendra Awhad faces Corruption Extortion Allegations from BJP Kirit Somaiya vjb 91
Mahavikas-Aghadi-Ministers
Mahavikas-Aghadi-MinistersE-Sakal

किरीट सोमय्यांचा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर खळबळजनक आरोप

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेतेमंडळींवर सध्या ईडी किंवा सीबीआयची टांगती तलवार आहे. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक या नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांसारख्या मंत्र्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पदाचा गैरवापर करून स्वत:ची मालमत्ता उभी केल्याचे आरोप केले आहेत. तशातच आता सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भ्रष्टाचाराने आरोप केले आहेत. "जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या लॉकडाउन काळात सारं काही बंद असताना सामाजिक कार्यकर्ता प्रवीण कलमे याच्या मदतीने वसुलीचा धंदा मांडला. SRA, म्हाडा अशा विविध ठिकाणी कलमेने आव्हाडांसाठी वसुली केली असून तो आव्हाडांचा सचिन वाझे आहे", असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत केला. (Mahavikas Aghadi Another Minister Jitendra Awhad faces Corruption Extortion Allegations from BJP Kirit Somaiya)

Mahavikas-Aghadi-Ministers
लॉकडाऊन जीवावर बेतला; विरारच्या हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

६ जुलै २०२० या दिवशी ८१ आरटीआय अर्जांचे उत्तर द्या असा आव्हाडांचा आदेश होता. ६ जुलै २०२० रोजी संपूर्ण मुंबईत १०० टक्के लॉकडाऊन होते. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (SRA) कार्यालयात १५ टक्के उपस्थिती होती. आव्हाडदेखील कोविडमधून काही दिवसांपूर्वीच बरे होऊन बाहेर आले होते. कोविडमधून बरे झाल्यावर लगेचच त्यांनी प्रविण कलमेच्या मार्फत ६ जुलै २०२० रोजीच्या एका दिवसात केलेल्या ८१ एसआरए प्रकल्पांची संपूर्ण माहितीची मागितली.

Jitendra Awhad
Jitendra Awhadsakal media

तसेच, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) मध्ये कलमे यांच्यासोबत ताबडतोब संयुक्त बैठक घ्या आणि अर्जदार कलमे यांच्यासोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या अभियंतासह संयुक्त पाहणी व भेट द्या. तसेच, SRA नियम अंतर्गत १ जानेवारी २००५ पासून मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती द्या, असे आदेश दिले. गृहनिर्माण मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे SRA ने रोडवे 2 प्रमाणे 31 प्रकल्पाची संयुक्त पाहणी करण्याचे वेळापत्रक बनवले व अनेक ठिकाणी संयुक्त पाहणीही केली. तसेच, या गोष्टीचा मंत्र्यांच्या कार्यालयातून नियमित पाठपुरावा केला जात होता. या संबंधीची सगळी माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद RTI कार्यकर्त्यांच्या मागणीवरून ६ दिवसांमध्ये ८१ प्रकल्पांचे तातडीने अहवाल का मागवण्यात आले? आव्हाड आणि कलमे यांचे संबंध काय आहेत?, असे प्रश्न भाजपचे किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले.

Mahavikas-Aghadi-Ministers
तिकीटावरून सापडला खूनी; ३६ तासात वसई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी असा दबाव आणून पदाचा दुरुपयोग करून माहिती अधिकार प्रावधानाचा भ्रष्टाचारासाठी दुरुपयोग करणे चूक आहे. अचानक ६ दिवसात ८१ अहवाल मागितल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांनी आपल्या क्षमतेची मर्यादा गृहनिर्माण मंत्री याच्याकडे उपस्थित केली होती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध झालेल्या आरोपाचे तटस्थ संस्थेकडून चौकशी करण्याचे सुचवले होते. कलमे यांनी या कोरोना काळात SRA मध्ये २०० च्या आसपास RTI अर्ज केले. असेच काही अर्ज म्हाडा आणि BMCमध्येही करण्यात आले आहेत. अर्जदार प्रविण कलमेचा उद्देश तर अपारदर्शक आहेच, पण त्या अर्जावर जितेंद्र आव्हाड यांनी ताबडतोब माहिती द्या, असे आदेश देणे तसेच प्रशासनावर दबाव आणणे याच्या मागचा हेतू नक्की काय?", असा सवालही त्यांनी केला.

Kirit Somaiya
Kirit Somaiya

"अर्जदाराचे ३०० अर्ज पाहताना स्पष्ट लक्षात येते की आव्हाड आणि कलमे यांची जोडी ही अनिल देशमुख आणि वाझे सारखी जोडी आहे. प्रवीण कलमे हा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा सचिन वाझे आहे. SRA ने यापूर्वी अशाच पद्धतीने DHFL चे ६०० कोटी रुपये कर्ज असलेले आणि Enforcement Directorate ची जप्ती असलेले SRA प्रकल्प तिसऱ्या खाजगी SRA विकासकाच्या नावाने करण्याचे साहस केले होते. ईडी ने यासंदर्भात SRA च्या काही अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा सुरु केली असल्याचे कळत आहे", अशी माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com