Devendra Fadnavis : फडणवीसांमुळे महावितरण ‘चार्ज’ : विश्वास पाठक

VIshwas Pathak & Devdnra Fadanvis
VIshwas Pathak & Devdnra Fadanvisesakal
Updated on

Devendra Fadnavis : सरकारी वीज कंपन्यांनी गेल्या वर्षभरात भरीव कामगिरी केली आहे.

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा क्षेत्रात राज्य पुन्हा प्रगतिपथावर आले आहे, असे महावितरणचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. (Mahavitaran Director Vishwas Pathak statement about devendra fadnavis mumbai news)

ते म्हणाले, ‘शेती, उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र, नागरी सुविधा अशा सर्व क्षेत्रांत वीज अत्यावश्यक बाब बनली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत राज्यावर लोडशेडिंगचे सावट होते. विकास प्रकल्प रखडल्याने सरकारी वीज कंपन्या आर्थिक संकटात आल्या होत्या.

परंतु, फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर धोरणात्मक दिशा निश्चितच दिली. उद्दिष्टे गाठण्यासाठी त्यांनी आर्थिक व प्रशासकीय पाठबळ दिले. त्यामुळे गेल्या वर्षभरात महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या सरकारी वीज कंपन्यांची गाडी पुन्हा रुळावर आली.

भाजप-शिवसेना युती सरकारच्या वर्षभराच्या कालावधीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा करण्याबाबत सात हजार मेगावॉट विजेची सौरऊर्जेद्वारे निर्मिती करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

VIshwas Pathak & Devdnra Fadanvis
Devendra Fadnavis: फडणवीस अन् मी एकत्र येण्याचं काही महत्व नाही, पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यात किमान तीस टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर चालविण्याचे मिशन २०२५ निश्चित केले आहे. उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याचा हेतू या योजनेमुळे साध्य होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, महानिर्मिती कंपनीने उच्चांकी वीजनिर्मिती केली. काळाची पावले ओळखून या कंपनीने रिन्युएबल एनर्जीसाठी नव्या कंपनीला चालना दिली आहे. राज्याची विजेची वाढती गरज लक्षात

घेऊन महापारेषण वीजवहनाच्या बाबतीत यशस्वी झाली. महापारेषणचे विजेचे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला ३० टक्क्यांनी वाढविण्यात आला. सर्वाधिक कृषी वीज कनेक्शन आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या बाबतीत भरीव कामगिरी ही या वर्षातील कामगिरीची वैशिष्ट्ये आहेत.

VIshwas Pathak & Devdnra Fadanvis
Devendra Fadnavis : फडणवीसांनी उट्टं काढलं! सरकारच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीतून शिंदे गायब; काँग्रेसचा निशाणा

महावितरणची कामगिरी

- इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात लक्षणीय कामगिरी

- आर्थिकदृष्ट्या मागास उद्योगांना वीजदराबाबत सबसिडी

- वस्त्रोद्योग, यंत्रमागाच्या वीजदरातील सबसिडी थकबाकी वितरित

- हायड्रोजन आणि सौर ऊर्जेसाठी भक्कम पावले

- पंप स्टोअरेज प्रोजेक्टसाठी सुमारे ९६ हजार कोटींचे गुंतवणूक करार

- सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीसाठी गुंतवणूक करार

VIshwas Pathak & Devdnra Fadanvis
Devendra Fadnavis : पवार साहेब बोलले ते सत्य आहे; बुलढाणा अपघातावरून राऊतांचा फडणवीसांना टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com