

Ulhasnagar smart meter controversy over high electricity bill and Mahavitaran
esakal
उल्हासनगर : शहरातील स्मार्ट मीटर वाद आता अधिकच तीव्र झाला असून, जुन्या मीटरच्या जागी नव्याने बसविण्यात आलेल्या मोटरनंतर वीजदेयकांमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक संतप्त झाले आहेत. महिन्याला सुमारे ८०० रुपये येणारे देयक थेट नऊ हजारांपर्यंत पोहोचल्याचा दावा करत महावितरणविरोधात नाराजी व्यक्त करत कार्यालयात धाव घेतली.