

Mahayuti And MVA Political Clash
ESakal
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने जागावाटपाचा तिढा सोडवला असला तरी अनेक इच्छुकांनी आपली दावेदारी कायम ठेवली आहे. दुसरीकडे विरोधकांच्या महाविकास आघाडीतही (मविआ) उमेदवारीवरून मतभेद उफाळले आहेत. त्यामुळे उमेदवारीवर एकमत न झाल्यास सत्ताधारी, विरोधकांत बंडखोरी अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे.