

BJP–Shinde Sena Rift Surfaces in Kalyan–Dombivli Civic Politics
sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: आगामी कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुतीच्या चर्चांना वेग आला असला, तरी जागावाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. आज पार पडलेल्या बैठकीत पाच ते सहा प्रभागावर एकमत न झाल्याने युतीबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे हा विषय आता वरिष्ठ पातळीवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.