

Atal Setu Toll Discount
ESakal
मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दहा मोठे निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्र सरकारने मुंबईतील अटल सेतूवरील इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल सवलत आणखी एक वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला.