

Apmc 50kg Bag Limit Mathadi Workers
ESakal
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. : कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजन उचलावे लागू नये यासाठी कांदे - बटाट्याच्या ५० किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोण्या भरण्यात येऊ नयेत, त्यासंदर्भातील माथाडी कामगारांची वेळोवेळी मागणी होती. त्यामुळे जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या - पिशव्यांची चढ - उतारा साठी ५० किलो वजना पर्यंत मर्यादा करण्यात आली आहे