बंगाल-तमिळनाडू निकालांचा महाराष्ट्रात धसका! 'खाती नीट सांभाळा, काम करा नाहीतर...'; फडणवीसांचा मंत्र्यांना कडक इशारा

Devendra Fadnavis News: बंगाल आणि तामिळनाडू निवडणुकांमध्ये प्रमुख नेत्यांच्या झालेल्या पराभवामुळे महायुती सरकार सतर्क झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना मंत्रिमंडळ सोडून जनतेमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
 Devendra Fadnavis warning ministers

Devendra Fadnavis warning ministers

ESakal

Updated on

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि एक केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये बंगाल आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त डझनभर मंत्र्यांना ज्या प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या कपाळावर चिंतेचे सावट आले आहे. या राज्यांमधील निवडणुकीच्या निकालांचा प्रभाव मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही जाणवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com