Ambulance Policy: रुग्णांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रात नवे अ‍ॅम्ब्युलन्स धोरण लागू; ४ अ‍ॅप्सशी जोडणार, जाणून घ्या नवी प्रणाली

Maharashtra Ambulance Policy: महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण लागू करणार आहे. डिजिटल ॲप, जीपीएस ट्रॅकिंग आणि निश्चित भाड्यांमुळे आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणि वेग येईल.
GPS tracking for ambulances Maharashtra

GPS tracking for ambulances Maharashtra

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील रुग्णवाहिका सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ बनवण्यासाठी मोटार वाहन विभाग लवकरच 'महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण' लागू करणार आहे. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, रुग्णवाहिका हे केवळ एक वाहन नसून, ती एक जीवनरेखा आहे, जी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com