CM Eknath Shinde : पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे निवडून येणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार डॉ. शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
CM Eknath Shinde : पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे निवडून येणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवली - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. आजची रॅली ही विजयाची रॅली आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशिर्वादाने कल्याण लोकसभा मतदार संघात येत्या निवडणुकीत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले जातील.

पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सुपुत्र व महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. शिंदे यांच्याविषयी व्यक्त केला. विजयाच्या हॅटट्रिकनंतर पुढची पाच वर्ष खासदार शिंदे तुमची सेवा करेल असे देखील ते म्हणाले.

कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत खासदार शिंदे यांचे वडील आणि राज्याचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, विश्वनाथ भोईर, सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे आणि महायुतीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी 8 वाजल्यापासून शहरात शिवसैनिकांची लगबग सुरू झाली होती. उन्हाचा पारा चढत असला तरी कल्याण, दिवा, कळवा मुंब्रा, अंबरनाथ उल्हासनगर, टिटवाळा, कल्याण ग्रामीणचा पट्टा, 14 गाव आदी भागातून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांसह येत होते.

डोंबिवलीच्या ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात जाऊन खासदार शिंदे यांनी श्री गणेशाचे दर्शन घेत अर्ज भरण्यासाठी मार्गस्थ झाले. याचवेळी मनसे पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शिंदे यांनी देखील मनसे शाखेमध्ये आपली उपस्थिती लावत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या यानंतर शिंदे रॅली सहभागी झाले.

ढोल ताशांचा गजर, झांज लेझीम चे पथक यांसह आदिवासी तारपा नृत्य, पंजाबचा भांगडा दक्षिण भारतातील कुचीपुडी कला या रॅलीत कलाकारांनी सादर करत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. चौका चौकात ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांची आदेशबाजी व फुलांची उधळण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उमेदवार श्रीकांत यांचे स्वागत केले जात होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रॅलीत सहभागी होत खासदार शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील विश्वास व्यक्त करत पुढे म्हटले, संपूर्ण राज्यात महायुतीची लाट निर्माण झाली आहे.

विदर्भात कडक्याच्या उन्हात देखील कार्यकर्ते प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते. कल्याण-डोंबिवलीतील आजची गर्दी त्याचीच साक्ष देत आहे. मागील 10 वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या रॅलीतून दिसली. पुढची पाच वर्ष कल्याण डोंबिवलीसाठी निधी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख होती. पण निवडून आल्यानंतर विकास कामातून त्यांनी आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लग्नसराईचा हंगाम सुरु आहे, लोक गावी गेले आहेत. त्यांना मतदानासाठी बोलवा, बुथवर आपल्याला जास्त काम करायचे आहे. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी बाहेर काढायचे आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे सगळ्यांनी 20 तारखेपर्यंत मेहनत करा, पुढची पाच वर्ष खासदार तुमची सेवा करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- रॅली सहभागी होणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णवाहिका पाण्याची सुविधा नाश्त्याची सुविधा करण्यात आली होती.

- उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नंतर लोकांनी दुकानांचा आसरा घेऊन सावलीत बसणे पसंत केले. यामुळे रॅलीत सहभागी नागरिक काहीसे विखुरले गेले.

- रॅलीत सहभागी होण्यासाठी बसेस भरून कार्यकर्ते नागरिक आले होते या बसेस खडके मार्गाला जोडणाऱ्या अरुंद रस्त्यांवर उभ्या केल्या गेल्याने त्या ठिकाणी वाहन कोंडीची समस्या उद्भवत होती.

- रस्त्यावर पडलेले पाण्याच्या बाटल्या वगैरे साफसफाई करण्यात येत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com