

Pimpleshwar Temple
ESakal
डोंबिवली : पिंपळेश्वर देवस्थान मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जमीन मंजूर करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता ८ जून रोजी मंदिर परिसरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री श्री पिंपळेश्वर मंदिरात उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.