Maharashtra Election 2024 : ‘मविआ’चे बहिष्कारास्त्र, महायुतीच्या १७३ जणांनी घेतली आमदारकीची शपथ

Vidhan Sabha Elections 2024 : महायुतीच्या १७३ आमदारांना विशेष हंगामी अधिवेशनात शपथ दिली, मात्र ईव्हीएम आणि निवडणूक आयोगामुळे मिळालेल्या बहुमतावर महाविकास आघाडीने विरोध केला आणि मारकडवाडीतील कारवाईच्या निषेधार्थ बहिष्कार टाकला.
Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024sakal
Updated on

मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्य विधीमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी महायुतीच्या १७३ आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ दिली. मात्र, ईव्हीएम, निवडणूक आयोगामुळे सरकारला बहुमत मिळाल्याचा ठपका आणि मारकडवाडीतील ग्रामस्थांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com