

माहीम : एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र तर दुसऱ्या बाजूला तीनदा आमदार राहिलेले सदा सरवणकर यांना धोबीपछाड देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महेश सावंत यांनी बाजी मारली. एका सर्वसामान्य शिवसैनिकाने दणदणीत मते घेत दोन बलाढ्य उमेदवारांचा पराभव केल्याने महेश सावंत हे ‘जायंट किलर’ ठरले आहेत.