esakal | Mumbai : डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Mumbai : डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : माहीम रेल्वे (mahim railway) सिग्नल परिसरातून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरच्या (Truck accident) धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू (Woman death) झाला. मृतक जयमाला लाड (वय 65) गारमेंटच्या खासगी दुकानात काम करण्यासाठी नेहमीप्रमाणे पायी जात होत्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात (mahim police station) गुन्हा नोंद (FIR) करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: बेघरांच्या लसीकरणाची जबाबदारी पोलिसांची नाही का?

सोमवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मृतक जयमाला त्यांच्या कामाच्या ठिकाणी पायी जात होत्या. दरम्यान मेट्रोच्या कामावर असलेल्या डंपरच्या भरधाव वेगाने जयमाला यांना धडक दिली दरम्यान माहीम पोलीसांनी जयमाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे यांनी डंपर चालक पंचुराम भारतीय, रा. उत्तरप्रदेश याला अटक केली असून, भांदवी कलम 279, 304 अ आणि 184 मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top