नवरात्र उपवासात आहाराचा समतोल सांभाळा, प्रतिकार शक्ती टिकवण्याचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

राहुल क्षीरसागर
Sunday, 18 October 2020

यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, शरीरातील रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी उपवास करताना आपल्या शरीरातील पोषण व समतोल आहार घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

ठाणे ः नवरात्र उत्सवात उपवास करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. भक्तांकडून नऊ दिवस देवीची श्रद्धेने-भक्तिभावाने पूजा करून उपवास करतात. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, शरीरातील रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी उपवास करताना आपल्या शरीरातील पोषण व समतोल आहार घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती टिकून राहिल्यास कोणत्याही आजाराच्या संसार्गाचा धोका कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे यंदा नवरात्रीचे उपवास करताना पोषण समतोल सांभाळणे महत्वाचे असल्याचा सल्ला आहार तज्ञांकडून देण्यात येत आहे. 

मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक, पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त

श्रावण महिन्यापासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपवास करण्यास सुरुवात होत असते. या उपवासाचे नवरात्रीत व्यापक स्वरुपात होत असते. अनेक भाविक ज्या दिवशी घटस्थापना करण्यात येते त्या दिवशी उपवास करतात, त्यानंतर अष्टमीला उपवास कृन्न नवमीला तो सोडतात. मात्र, काही जण निराहार राहतात (काहीच न खाता), काही फलाहार घेतात. मात्र, असे उपवास करीत असताना अनेकदा शरीरातील पोषण व समतोल ढासळण्याची शक्‍यता असते, त्यामुळे आजारांचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यात यंदा सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे, त्यावर ठोस उपाययोजना देखील नाही. त्यामुळे या आजाराशी मुकाबला करण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

या कारणाने यंदाच्या वर्षी नवरात्रीचे उपवास करीत असताना, शरीरातील पोषण व समतोल आहार घेणे महत्वाचे असून शरीरातील प्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे व्हिटॅमीन सी, कॅल्शियम आणि प्रथिने ही पोषणमुल्ये असलेला आहार सध्याच्या कोरोनाचा काळात आहारात घेणे आवश्‍यक असल्याचे मत आहार तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

 

सध्यस्थितीत कोव्हिड -19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असताना, शरीराला संपूर्ण पोषण किंवा समतोल आहार घेणे आवश्‍यक आहे. शरीराचे पोषण पूर्ण असेल तरच प्रतिकारशक्ती पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकते. त्यात एखाद्या आजाराचा संसर्ग झाला तरी शरीर त्याविरुद्ध सक्षमपणे लढून आजार होण्यापासून किंवा आजाराचे प्रमाण अटोक्‍यात राहण्यास मदत होत असते. 
- प्रिया गुरव,
आहार तज्ञ, जिल्हा रुग्णालय, ठाणे. 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maintain a balanced diet during Navratri fasting dietician advises to maintain immunity