मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक, पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त

संदीप पंडित
Sunday, 18 October 2020

आज (सोमवारी) भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे. 

भाईंदर ः गेले काही दिवस मीरा-भाईंदर शहराचा पाणी पुरवठा विस्कळित झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावर विविध पक्ष आवाज उठवत आहेत. माजी विरोधी पक्षनेता आसिफ शेख यांनी उपमुखमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. त्यानुसार आज (सोमवारी) भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे. 

कोविडमुक्त 22 वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपण, भारतातील पहिली शस्त्रक्रिया

मीरा भाईंदर मध्ये अपुऱ्या पाण्याने लोकांचे हाल होत आहेत. मीरा भाईंदर महानगर पालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 150 द. ल. मि.ली. पाणी मिळावे अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. आमदार सरनाईक यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची रविवारी मंत्रालयात भेट घेतली व मीरा भाईंदरच्या पाणी समस्या बाबत सविस्तर चर्चा केली. आमदार सरनाईक यांनी केलेल्या विनंतीनुसार मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवार (ता. 19) मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीचे आदेश दिले आहेत. या बैठकीला खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, महापौर ज्योत्सना हसनाळे, माजी आमदार मुझफ्फर हुसैन, आयुक्त विजय राठोड तसेच पालिका पदाधिकारी यांना या बैठकीस निमंत्रित करण्यात येणार आहे. 

'कोरोना काळात जन्माला आलेल्या नवजात बाळांची काळजी घेणे महत्वाचे'

25 एमएलडी पाणी कायमस्वरूपी मिळणार - 
मिरा भाईंदर शहराचा एमआयडीसीने बंद केलेला 25 एमएलडी पाणी पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री दर्जा व मिरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते डॉ. आसिफ शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना मिरा भाईंदर शहराच्या पाणी समस्या बाबत माहिती दिली असता अजित पवार यांनी हे आश्वासन दिले. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting at the Ministry on Mira Bhayanders water issue citizens angry over water supply disruption