Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेवर फ्रान्सनिर्मित लढाऊ विमानाची यशस्वी चाचणी.
Successful landing of Rafale Marine on INS Vikrant

Successful landing of Rafale Marine on INS Vikrant

sakal

Updated on: 

- नितीन बिनेकर

मुंबई - भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात भर घालणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर फ्रान्सनिर्मित ‘राफेल मरीन’ या लढाऊ विमानाने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग केली. गुरुवारी (ता. २९) ही चाचणी पार पडली. या यशामुळे भारतीय नौदलात राफेल मरीनच्या प्रत्यक्ष वापराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. विमानवाहू युद्धनौकेवरील मर्यादित जागेत लढाऊ विमानाचे सुरक्षित अवतरण करण्याची क्षमता तपासण्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

Loading content, please wait...