
मुंबई : लसीची ने-आण करताना मालाड (Malad) येथे एका आरोग्य सेविकेचा (Arogya Sevika) गंभीर अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात आरोग्य सेविका गंभीर जखमी झाल्या आहेत. लस आणायला गेलेल्या या आरोग्य सेविकेच्या रिक्षाला एका मोटरसायकलने ठोकल्याने रिक्षात बसलेल्या आरोग्य सेविका रस्त्यावर कोसळल्या. यात याच्या जबड्याला गंभीर मार बसला असून सध्या त्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital) दाखल असून उपचार सुरू आहेत. मात्र, लसीची ने-आण करताना (corona vaccination) सोबत जबाबदार पालिका स्टाफ असल्या शिवाय त्या हे काम करत होत्या. यामुळे यापुढे सीएचव्ही स्टाफ सोबत असल्या शिवाय आरोग्य सेविका कुठेही बाहेर जाणार नसल्याचे सांगत जखमी आरोग्य सेविकेला रुग्णसेवेचा खर्च (patients expenses) तसेच पाच लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून (BMC employee union) करण्यात आली आहे.
पी उत्तर वाॅर्डात दिंडोशी आरोग्य केंद्र आहे. येथील आरोग्य सेविकांना लस न्यायला वाॅर्डला पाठवण्यात आले. लसीची ने-आण करणे आरोग्य सेविकेचे काम नसून आयाबाई किंवा स्टाफ नर्स काम करत असते. मात्र, या ठिकाणी या आरोग्य सेविकेला पाठवण्यात आले. यात जयश्री कांबळे आणि मेघना दवंडे रिक्षाने वाॅर्डला जात होत्या. मालाड पूर्वेच्या पोद्दार डेपोसमोर एका मोटरसायकल स्वाराने त्यांच्या रिक्षाला जबरी ठोकले. या धक्क्याने जयश्री कांबळे या रिक्षातून बाहेर पडल्या. रस्त्यावर आदळल्याने त्यांच्या जबड्याला जबरी मार बसल्याने त्या रस्त्यावरच कोसळून बेशुद्ध झाल्या. मेघना दवंडे यांना देखील दुखापत झाली. मात्र, जयश्री यांना जबरी मार बसल्याने रस्त्यावरील लोकांनी त्यांना खासगी सुचक हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. दिड तासानंतर पालिका स्टाफ सुचक हाॅस्पिटलमध्ये आल्यावर त्यांना गोविंद नगर पालिकेच्या रुग्णालयात नेले. मात्र, गोविंद नगर रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्वरीत केईएम अथवा कुपर रुग्णालयात हलवण्याचे सुचवले.
सध्या जयश्री कांबळे यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविकेला रस्त्यावर अपघात झाल्यास कोण जबाबदारी घेणार असे इतर आरोग्य सेविका विचारत आहेत. तर आरोग्य सेविका पालिका स्टाफ सोबत असल्या शिवाय कोणतीही वस्तू आणण्यासाठी कुठेही जाणार नाही अशी कामगार संघटनेने भुमिका घेतली आहे. तसे न झाल्यास कामावर बहिष्कार घालण्यात येईल असेही सांगण्यात आले. मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने याचा निषेध करत जखमी आरोग्य सेविकेला रुग्णालयीन खर्च देऊन पाच लाख नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.