विद्यार्थ्यांची फी माफ; घरासाठी ठेवलेल्या ४ लाखांची गरिबांना मदत, 'या' महिलेला सलाम

विद्यार्थ्यांची फी माफ; घरासाठी ठेवलेल्या ४ लाखांची गरिबांना मदत, 'या' महिलेला सलाम

मुंबईः  कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रसार झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. गेले तीन ते चार महिने लॉकडाऊन असल्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झालेत. काहींच्या घरी परिस्थिती बिकट आहे. काही पालकांकडे मुलांची फी भरायला देखील पैसे नाहीत. अशातच या कठीण परिस्थितीत मुंबईतल्या मालाड भागात राहणाऱ्या एका दाम्पत्यानं चांगल्या माणुसकीचं उदाहरण दिलं आहे. 

या दाम्पत्यानं गरीब मुलांच्या शिक्षणांचा भारच उचलला नाही तर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना दोन वेळेचं जेवणही पुरवलं. या कामासाठी या लोकांनी आपली 4 लाख रुपयांची सेव्हिंगस मोडली. 

मालाडच्या मालवणी भागात राहणाऱ्या मिर्झा शेख यांची गोष्ट खूप वेगळी आहे. मिर्झा येथील एका स्थानिक शाळेत प्रिन्सिपल आहे. मुंबईतल्या अन्य लोकांप्रमाणे त्या देखील लॉकडाऊनच्या काळात घरात राहिल्यात. अलीकडेच मिर्झा शेख यांचे विद्यार्थी त्यांना म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांचे कामं ठप्प असल्यानं ते शाळेची फी भरण्यास असमर्थ आहेत. 

या संकटात मिर्झा यांनी आपल्या मुलांना अभ्यासआणि फीची चिंता करू नका असं सांगितलं.  त्यानंतर मिर्झा यांनी शालेय मुलांची तीन महिन्यांची फी माफ करण्याचा निर्णय घेतला. मिर्झा यांनी सांगितलं की, सर्व मुलांनी असेही म्हटले आहे की त्यांच्या घरात एकच स्मार्टफोन आहे जो त्यांचे पालक त्याचा वापर करतात. अशा परिस्थितीत ऑनलाईन वर्गांना अडचणी निर्माण होताहेत. 

दरम्यान, मिर्झा यांना समजलं की शाळेत शिकणाऱ्या बऱ्याच मुलांचे पालक बेरोजगार झालेत. त्यामुळे त्यांना दोन वेळंच जेवण मिळण्यातही अडचणी निर्माण होताहेत. 

मित्रांसोबत मदत करण्यास पोहोचल्या मिर्झा 

या माहितीनंतर मिर्झा शेख यांनी त्यांचा पती फयाज यांच्यासह काही मित्रांना एकत्र केले आणि या गरीब लोकांना जेवण पुरवण्याची घालण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. मिर्झा यांनी आपल्या पतीसोबत घरं खरेदी करण्यासाठी बाजूला ठेवलेले चार लाख रुपये सेव्हिंगमधून काढले आणि त्यातून गरिबांना मदत केली. यानंतर या सर्व लोकांनी मालाड आणि आसपासच्या भागातील जवळपास 1500 लोकांना रेशन आणि भोजन वाटप केले.

लोकांनी मानले आभार 

मालाडमध्ये राहणारे ऑटो ड्रायव्हर सगीर अहमद यांनी सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात माझा हात फ्रॅक्चर झाला. अशात कुटुंबात कमाई न झाल्यानं मोठं संकट समोरं होतं. अशा काळात मिर्झा शेख आणि त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला बरीच मदत केली. तर मालडाच्या अंबुजवाडीमध्ये राहणाऱ्या शबाना शेख यांनी म्हटलं की, काही घरकाम करुन माझ्या कुटुंबियांचा गाडा चालवायची. मात्र लॉकडाऊनच्या काळात काम सुटलं. अशात मिर्झा शेख आणि त्यांच्या मित्रांनी मिळून मदत केली.

malad mirza khan help 1500 people from home saving lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com