नशिबवान! बाईकवर असताना त्याच्या डोक्यात झाड पडलं पण...

नेमकी कशी घडली घटना?
Thirty people die in five years due to falling trees in Mumbai
Thirty people die in five years due to falling trees in Mumbaifile photo

मुंबई: 'तौत्के' चक्रीवादळामुळे सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. यावेळी मालाड पूर्वेला (malad east) एक दुर्देवी दुर्घटना घडली. बाईकवरुन चाललेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर झाडं पडलं. (tree Fall) राजकुमार जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे. परिसरातील एका दुकानामध्ये सुरु असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. झाड थेट अंगावर पडल्याने राजकुमार जैस्वाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.(malad Tree falls on salesmans head helmet saves his life)

सायन हॉस्पिटलमध्ये तब्बल १३ तास शस्त्रक्रिया सुरु होती. कुरार येथे राहणारे राजकुमार जैस्वाल किराणामालाच्या दुकानातून बाहेर पडले. त्याचवेळी तिथे असलेले एक झाड सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राजकुमार यांच्या अंगावर पडले. एका व्यावसायिकाने लगेच त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासले, त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर डॉक्टराने राजकुमारला सायन हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

Thirty people die in five years due to falling trees in Mumbai
महाराष्ट्रात तरुणाईच्या मृत्यूचे प्रमाण जास्त का ?

"सकाळी ११ च्या सुमारास राजुकमार किराणामालच्या दुकानात आला व त्याने काही वस्तु घेतल्या. तिथून निघाल्यानंतर बाईकवर बसताना त्याने हेल्मेट घातले. तितक्यात एक मोठे झाड त्याच्या अंगावर पडले. यात राजकुमार गंभीर जखमी झाला" असे अमित सेठीया यांनी सांगितले. तेच जैस्वालला रुग्णालयात घेऊन गेले.

Thirty people die in five years due to falling trees in Mumbai
'मित्रांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले', 'टायटॅनिक पेक्षाही भयानक स्थिती'

राजकुमारची पत्नी आमि मुले गावावरुन निघाली असल्याचे जैस्वालचा भाचा प्रमोद कुमारने सांगितले. राजकुमारच्या प्रकृतीला आता धोका नाही. पण अजूनही तो बेशुद्धच आहे असे प्रमोद कुमार म्हणाला. राजकुमारच्या डोक्यात हेल्मेट असल्यामुळे तो बचावला असे त्याच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com