esakal | Malad : अनधिकृत मासेमारीला पायबंद बसणार
sakal

बोलून बातमी शोधा

malad

Malad : अनधिकृत मासेमारीला पायबंद बसणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालाड : अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ ची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी ५ नवीन अत्याधुनिक गस्तीनौका भाडेतत्त्वावर घेण्यास राज्य सरकारच्या मत्स्यविभागाने मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी दिली.

शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या सागरी हद्दीत अवैध एलईडी/पर्ससीन साहित्य वापरून राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय परराज्यातील हायस्पिड नौकांची घुसखोरीचा मुद्दाही कायम आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी सरकारच्या १ सप्टेंबर २०१५ रोजी काढलेल्या निर्णयातील गस्तीनौकांसंबंधीच्या अटी, शर्ती व तांत्रिक तपशीलांमध्ये ६ सप्टेंबर २०२१ रोजी शुद्धीपत्रक काढून महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.

भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या या गस्तीनौका यांत्रिकी स्वरुपाच्या असतील. यांत्रिकी नौकेची लांबी किमान २० मीटर व रुंदी ७.० मीटर असेल. नौकेची इंजिन क्षमता किमान ४५० अश्वशक्ती (डबल इंजिन) आणि वेग मर्यादा किमान २५ नॉट एवढी असेल. नौकेवर नौकानयनासाठी संभाषणासाठी अद्यावत यंत्रसामुग्री असेल.

हेही वाचा: मुंबईत फूल बाजाराला बहर

या नव्या बदलांमुळे गोवा, कर्नाटक, केरळ, गुजरात व अन्य राज्यांतून येऊन अनधिकृत मासेमारी करणाऱ्या वेगवान व जास्त इंजिन क्षमतेच्या नौकांना पकडणे शक्य होईल, असे मत अस्लम शेख यांनी शेवटी व्यक्त केले.

पारंपरिक मच्छीमारांचे हित केंद्रस्थानी ठेवूनच मत्स्यव्यवसाय विभागातर्फे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. एल. ई. डी. व अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी 'महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१'मध्ये महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. लवकरच नवीन कायदा अस्तित्वात येईल.

- अस्लम शेख, मंत्री,

वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे

loading image
go to top