
मुंबई ः एका वर्षापूर्वी मालाडमध्ये भिंत पडून झालेल्या अपघातात 33 जणांचे निधन झाले होते. त्या अपघातात आठ वर्षाची प्रिया ननावरे वाचली होती, पण तिच्या अन्य कुटुंबियांचे निधन झाले होते. त्यावेळी तिला 18 वर्षाची झाल्यावर 55 लाखाची मदत देण्यात येईल, तिला प्रत्येक महिन्यात साह्य देण्यात येईल, असे आश्वासन प्रियाची आजी आजी सत्यभामा पवार यांना दिले होते.
याचबरोबर आश्वासन देण्यात आलेले पर्यायी घरही देण्यात आलेले नाही.
मालाडच्या या दुर्घटनेत नुकसान झालेल्या काहींना घराची भरपाई मिळाली आहे. सत्यभामा गेल्या तीन महिन्यांपासून कोणतेही काम नसल्यामुळे घरात आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर खाण्याचा प्रश्न झाला आहे. प्रियाला 18 व्या वर्षी मदत देण्यात येईल असे सांगितले होते, पण ती तोपर्यंत जीवंत राहिल का हेही बघायला हवे, असे प्रियाच्या नातेवाईक सांगतात.
गतवर्षी एक जुलैच्या मध्यरात्री पिंपरी पाडा आणि मालाड पूर्व येथताील आंबेडकर नगरमधील भिंत कोसळली होती. जोरदार पावसामुळे मालाडमधील पाणी वेगाने वाहिले होते आणि त्यात झोपडपट्ट्या वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेत 10 मुलांसह 33 जणांचे निधन झाले होते. प्रियाचे आई वडिल, दोन बहिणी आणि एक भाऊ या जोरदार पाण्यात वाहून गेले होते. यावेळी प्रिया लाकडी फळ्यांमुळे वाहून गेली नाही. तिच्या आईच्या भावाने तिला त्यातून बाहेर काढले. या धक्क्यातून सावरण्यास प्रियाला दोन महिने लागले. तिला तिची आजी सांभाळत आहे.
प्रियाची आजी सत्यभामा आणि अन्य नातेवाईंकामध्ये प्रिया कोणाकडे राहणार यावरुन वाद झाले. दुर्घटनेतील मृतांना मुंबई महापालिकेने पाच लाख आणि राज्य सरकारने सहा लाखाचे साह्य करण्याचे ठरवले. त्यामुळे प्रियाला एकंदर 55 लाख मिळणार होते. यावरुन वाद सुरु असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही रक्कम बँकेत ठेवण्याचे ठरवले. त्याद्वारे प्रियाला दर महिन्याला रक्कम मिळणार असल्याचे ठरवण्यात आले. मात्र ही रक्कमच जमा होत नसल्याचा दावा केला जात आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.