Malanggad Yatra Festival : मलंगगडावर भाविकांचा धोकादायक प्रवास ; फ्युनिक्युलर ट्रॅकवरून चढाई

माघ पौर्णिमेनिमित्त मलंगगड यात्रा उत्सव सुरु असून गडावर भाविकांचा राबता आहे. नागरिकांना गडावर सोयीस्कररित्या जाता यावे म्हणून फ्युनिक्युलर ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे.
Magh Purnima Yatra
Magh Purnima Yatra sakal

डोबिवली : माघ पौर्णिमेनिमित्त मलंगगड यात्रा उत्सव सुरु असून गडावर भाविकांचा राबता आहे. नागरिकांना गडावर सोयीस्कररित्या जाता यावे म्हणून फ्युनिक्युलर ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हे काम अपूर्ण असल्याने ती सुरू झालेली नाही. नागरिकांनी मात्र ट्रॉली नाही ट्रॅक ओके म्हणत गडावर पायी जाण्यास सुरवात केली आहे. ट्रॅकवरून चालत जाणे धोकादायक असून खाली खोल दरी आहे. अंधारात भाविक या ट्रॅकवरून चालत असून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर माघ पौर्णिमेला श्री मलंग उत्सव साजरा करण्यात येतो. राज्यभरातून भाविक येथे या उत्सवाच्या निमित्ताने येत असतात. मलंगगडावर श्री मच्छिंद्र नाथांच्या समाधीचे दर्शन घेत असतात. मलंगगडावर जाण्यासाठी अडीच हजार पायऱ्या आहेत. परंतू गडाचा उभा चढ असल्याने भाविकांची मोठी दमछाक या ठिकाणी गडावर जाताना होते. अनेक भाविक तर यामुळे वरती दर्शनासाठी जाऊ शकत नाही. त्यातच उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून सकाळी 11 नंतर गडावर चढाई करणे म्हणजे मोठे जिकीरीचेच झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी शासनाच्या वतीने फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा येथे उभारण्यात आली आहे. या ट्रॉलीची ट्रायल सुरु असून भविष्यात ही सुविधा नागरिकांसाठी लवकर सुरु होईल. यंदाच्या माघ पौर्णिमेला ही सुविधा उपलब्ध होईल अशी आशा होती. मात्र काम पूर्ण झाले नसल्याने ती सुविधा सुरु करण्यात आलेली नाही.

Magh Purnima Yatra
Dombivli : डोंबिवली नगरी झाली बालाजीमय ; श्री बालाजी,भूदेवी आणि श्रीदेवीच्या पारंपरिक विवाह सोहळा डोंबिवलीत संपन्न

ट्रॉलीची सुविधा सुरु नसली तरी त्यासाठी उभारण्यात आलेल्या ट्रॅकचा वापर भाविकांनी केल्याचे दिसून येत आहे. ट्रॅकला लागून असलेली लोखंडी जाळीवरुन हजारो भाविक गडावर चढाई करत आहेत. दुपारच्या प्रहरी चढणे शक्य नसल्याने पहाटे लवकर भाविक गडावर चढतात. अंधार तसेच खाली खोल दरी असल्याने एखाद्याचा तोल गेलाच एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या ट्रॉलीचे काम पूर्ण झाले नसून तीची ट्रायल सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घडणार नाही याची शाश्वती नसताना येथून प्रवास करणे हे धोकादायक ठरत आहे. तसेच येथून सामानाची देखील वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी संबंधित कंत्राटदार कंपनीने एखाद्या सुरक्षा रक्षकाची नेमणूक करुन भाविकांना येथून प्रवास करु देऊ नये अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com