esakal | संकटांना आवरा हो ! कोरोनासोबत मलेरियाच्या वाढत्या रुग्णांनी पालिकेची चिंता वाढवली
sakal

बोलून बातमी शोधा

संकटांना आवरा हो ! कोरोनासोबत मलेरियाच्या वाढत्या रुग्णांनी पालिकेची चिंता वाढवली

मुंबईत पाऊस सुरु झाला आणि कोरोनाची साथ असतानाच पावसाळ्यात वाढणारे मलेरिया तसेच डेंगीचे रुग्णही वाढले आहेत. मे महिन्यांच्या तुलनेत या रुग्णात दुप्पट वाढ जूनमध्ये झाल्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे.

संकटांना आवरा हो ! कोरोनासोबत मलेरियाच्या वाढत्या रुग्णांनी पालिकेची चिंता वाढवली

sakal_logo
By
संजयघारपुरे

मुंबई ः मुंबईत पाऊस सुरु झाला आणि कोरोनाची साथ असतानाच पावसाळ्यात वाढणारे मलेरिया तसेच डेंगीचे रुग्णही वाढले आहेत. मे महिन्यांच्या तुलनेत या रुग्णात दुप्पट वाढ जूनमध्ये झाल्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे.
मुंबई महापालिका रुग्णालयात जून महिन्यात मलेरियाचे 328 रुग्ण दाखल झाले तर डेंगीचे चार आणि लेप्टोसायरीसचा एक. मे महिन्यात मलेरियाचे 163 रुग्ण होते, तर डेंगीचे तीन आणि लेप्टॉसायरीसचा एक. आत्तापर्यंत मलेरिया, डेंगी तसेच लेप्टोसायरीस झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आम्हाला आढळलेले नाही, असे केईएमचे डीन डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. या रुग्णालयात सध्या मलेरिया आणि डेंगीवर उपचार सुरु असलेले एकूण 40 रुग्ण आहेत. 

सुशांत आत्महत्या प्रकरणात सलमान खानची चौकशी होणार नाही, वाचा कोणी दिली माहिती.. 

दूषीत पाण्यामुळे रुग्णांवरील उपचारासाठी केईएममध्ये एक वॉर्ड राखून ठेवण्यात आला आहे. मलेरिया, डेंगीवरील उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांची कोरोना चाचणीही केली जात आहे. दोन्ही रोगांच्या लक्षणात खूपशी समानता आहे. कोरोना रुग्णांचीही आम्ही डेंगी चाचणी करीत आहेत, पण खूपच कमी कोरोना रुग्णांना डेंगीची बाधा झाली आहे. ते पाठदुखी तसेच जॉइंट पेनने त्रस्त आहेत, पण ते बरे होतील, असे वोखार्ड रुग्णालयातील डॉ बेहराम पार्डीवाला यांनी सांगितले. 

'या' महिन्यात मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्या धावण्याची शक्यता 

कोरोना आणि पावसाळ्यातील रोग एकाचवेळी झालेल्यांची संख्या खूपच कमी आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यावर दिर्घ ब्रेक येतो, त्यावेळी डास वाढतात. मुंबईत पाणी अजून मोठ्या प्रमाणावर साठलेले नाही, त्यामुळे अजून रुग्णांची संख्याही जास्त नाही. अर्थात हे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. पावसाळ्यात जास्त होणाऱ्या लेप्टोसायरीस, डेंगी, मलेरिया, टायफाईड, गॅस्ट्रो, कॉलरा या रोगांवरील उपचारासाठी आठ हजार बेडस्् राखून ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय महापालिकेचे दीडशे दवाखानेही आहेत.

----------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

loading image
go to top