BMC: मुंबईत पावसाळी आजारांचे थैमान, मलेरियाचा धोका वाढतोय

गॅस्ट्रोपाठोपाठ हेपेटाइटिसच्या रुग्णांची वाढती संख्या
malaria insect
malaria insectsakal media

मुंबई : मुंबईत (Mumbai) कोरोना नियंत्रणात (Corona) आला असला तरी पावसाळी आजार (Monsoon deceases) वेगाने पसरत आहेत. मुंबईत सध्या मलेरियाने(Malaria) जोर धरला आहे. मलेरियाचे मुंबईत 2 हजारांहून अधिक रुग्ण (Mumbai Patients) आहेत. तर, त्यापाठोपाठ गॅस्ट्रो आणि हेपेटाइटिसच्या रुग्णांनीही जोर धरला आहे. ( Malaria gastro monsoon deceases increases in Mumbai-nss91)

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलेरियाचे गेल्या सात महिन्यांपासून मुंबईत 2146 रुग्ण सापडले आहेत. तर 18 जुलैपर्यंत मुंबईत 385  मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात एकूण 954 रुग्ण सापडले होते. मात्र, आतापर्यंत मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे जी दक्षिण, ई , एफ दक्षिण आणि जी उत्तर या वाॅर्डमध्ये सध्या सापडत आहेत.

malaria insect
मुंबई विद्यापीठाला मुसळधार पावसाचा फटका, 'या' परीक्षा पुढे ढकलल्या

लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण दुप्पट

लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यावर्षी दुप्पट नोंदले गेले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 14 रुग्णांची नोंद झाली होती. पण, यंदा 26 रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. तर, सात महिन्यात आतापर्यंत 85 रुग्णांची नोंद पालिकेने केले आहे.

7 वाॅर्डमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण जास्त

यावर्षीच्या जुलै महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 15 रुग्ण सापडले आहेत. तर, गेल्या वर्षी स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण सापडला नव्हता. तर, या वर्षी जुलै महिन्यापर्यंत एकूण 22 रुग्णांची नोंद झाली आहे. स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील डी, जी दक्षिण, के पूर्व , के पश्चिम, पी, एस आणि टी वॉर्डमध्ये सापडले आहेत. म्हणजेच आतापर्यंत या वॉर्डमधून सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, गॅस्ट्रो आणि हेपेटायटीस रुग्ण ही वाढत असून गॅस्ट्रोच्या 1432 रुग्णांची नोंद झाली आहे तर, हेपेटायटीसचे 108 रुग्ण सापडले आहेत.

malaria insect
NDRF: वैतरणा नदी पात्रात वाहिन्यांवर अडकलेल्या कामगारांचा बचाव

"पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मान्सून संबंधित रुग्ण पूर्वीपेक्षा 10 ते 20% वाढले आहेत. मान्सून संबंधित आजारांमध्ये डेंग्यू, व्हिवॅक्स मलेरिया, फाल्सीपेरम मलेरिया हे आजार आहे. अनेक रूग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग ही झाला आहे. कोविड आणि नॉन-कोविड आजारांची लक्षणे सारखीच असल्याने उपचार करताना गफलत होऊ शकते. त्यामुळे डाॅक्टरांचा सल्ला घ्या."

- डॉ. हरीश चाफले, वरिष्ठ सल्लागार, पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअर, ग्लोबल रुग्णालय

7 महिन्यांची आकडेवारी -

मलेरिया       - 2146

लेप्टोस्पायरोसिस- 85

डेंग्यू - 64

गॅस्ट्रो -1432

हेपेटाइटिस-108

एच1एन 1 -22

पालिका सज्ज

पावसाळी आजारांसाठी मुंबई पालिका सज्ज आहे. सर्व रुग्णालयांना बेड्स आरक्षित ठेवण्यास सांगितले आहे असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com