मलबार हिल ते वरळीपर्यंत सहा किमीचा सागरी पदपथ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

मुंबई - वरळी सी फेसमधील ८३ वर्षे जुना आणि दोन किलोमीटर लांबीचा पदपथ किनारी मार्गाच्या कामात इतिहासजमा होणार आहे. मलबार हिलमधील प्रियदर्शनी पार्क ते वरळीतील सागरी सेतूपर्यंत तब्बल सहा किलोमीटरचा पदपथ बांधला जाणार असून, सायकल ट्रॅकही तयार केला जाणार आहे. मरीन ड्राईव्हच्या सागरी पदपथापेक्षाही ताे मोठा असेल.

नरिमन पॉईंट ते वरळी सागरी सेतूपर्यंत सुमारे नऊ किलोमीटर अंतराच्या कोस्टल रोडचे काम सुरू झाले आहे. त्याअंतर्गत मलबार हिलमधील प्रियदर्शनी पार्कपासून सागरी सेतूपर्यंत २० मीटर रुंदी आणि ६.४ किलोमीटर लांबीचा पदपथ तयार करण्यात येईल. त्यात महालक्ष्मीजवळील लोटस पार्क ते वरळीतील समुद्र महल इमारतीपर्यंत ४०० मीटरच्या पुलाचा समावेश आहे. त्या पुलावर रस्त्यालगत दोन्ही बाजूंना सात मीटर रुंदीचा पदपथ बांधण्यात येणार आहे. सध्या नरिमन पॉईंट भागात ३.५ किलोमीटर लांबीचा पदपथ आहे.

कोस्टल रोड चार वर्षांत पूर्ण झाल्यानंतर ६.४ किलोमीटरचा पदपथ सर्वांत अधिक अंतराचा ठरेल. कोस्टल रोडसाठी समुद्रात ९६ लाख ८७ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर भराव घालण्यात येणार आहे. त्यापैकी २१ लाख ५२ हजार ८७० चौरस फुटांवर रस्त्याचे काम होईल. उर्वरित ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांवर नागरिकांसाठी विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत.

अशा असतील सुविधा 
 तीन भूमिगत वाहनतळ (प्रत्येकी क्षमता १६२५)
 खुले नाट्यगृह
 खेळांची मैदाने
  फुलपाखरू उद्यान

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malbar Hill to Varali Sea Lane