Thane Traffic Issue : ठाणेकरांच्या माथी मॉल, डेटा सेंटर अन् वाहतूक कोंडी; अवास्तव नियोजनावर नजीब मुल्ला यांची टीका

ठाणे शहरातील डेटा सेंटर, वाढती वाहतूक कोंडी, नव्या मॉलला मंजुरी आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Thane Traffic

Thane Traffic

sakal

Updated on

ठाणे - ठाणे शहरातील बाळकुम येथील प्रस्तावित डेटा सेंटर, घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, नव्या मॉलला मंजुरी आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत शहरातील विविध प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत प्रशासनावर टीकेची झोड उठवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com