३१ ऑगस्टपर्यंत माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद

नंदकिशोर मलबारी
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सरळगांव - २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वारंवार घाटात दरड कोसळत असल्याने निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या महिन्याभरात दोन वेळा घाटात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

अनेक पर्यटक माळशेज घाटात निसर्गरम्य वातावरण, पडणारे पाऊस व मनाला मोहित करणारा धुक्याचा आनंद घेण्यासाठी  येत असतात. परंतु, आता माळशेज घाटात पर्यटकांना थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजता माळशेज घाटात वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु, पर्यटकांसाठी मज्जाव करण्यात आला आहे. 

या काळात पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून धबधबा परिसरात आपली वाहने 1 किमी परिसरात लावू नये. तसेच पाण्यात पोहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी, मद्यपान, यावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन करण्यात आले असून आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात प्रशासनाकडून आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The malshej Ghat closes for tourists till August 31