
किन्हवली : मुरबाड–माळशेज घाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असल्यामुळे रस्ता जागोजागी खोदला आहे. परिणामी, टोकावडे ते सोगावमार्गे किन्हवलीवरून कल्याण, पनवेल, नाशिक, ठाणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने थेट गावातून जात आहेत. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावरून कंटेनर व अवजड वाहने दिवसरात्र धावत असल्याने सोगाव गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न झाला आहे.